Vachmi
|| श्रीगणपत्यथर्वशीर्षम् ||
(Shri Ganapati Atharvashirsha)
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे.
थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो.
थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो.
स्वस्तिक / स्वस्ति मंत्र / शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे. डोळ्यांनी शुभ बघावे.
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ।
स्थिर अंगांनी आणि सुदृढ शरीरांनी, जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी.
स्वस्ति न इन्द्रोवृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ (सर्व जाणणारा) पूषा (सूर्य) देव आमचे कल्याण करो.
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नोबृहस्पतिर्दधातु॥
(सर्वांचे) रक्षणकर्ता गरुड (अस्तार्क्ष्यो) आमचे कल्याण करो. सर्वांना अनुकुल असणारा बृहस्पति आमचे मंगल करो/रक्षण करो.
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ॐ शान्ति शान्ति शान्ति
ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हर्तासि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥
श्री गणपतीला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्म तत्व आहेस. तूच एक या सृष्टीचा निर्माणकर्ता आहेस. तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस. तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस. खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि । अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् ॥ २॥
मी खरं बोलत आहे. मी त्रिकालबाधित सत्य बोलत आहे. तू माझे रक्षण कर. हे सत्य जो बोलतो (उच्चारण करतो) त्याचे (माझे) रक्षण कर. हे सत्य जो ऐकतो त्याचे (माझे) रक्षण कर.
अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥ ३॥
हे सत्य जो देतो आहे त्याचे (माझे) रक्षण कर. जो त्याचे समर्थन करतो आहे त्याचे (माझे) रक्षण कर. ह्याचे जे पुनरुच्चारण करतात त्या माझ्या शिष्यांचे रक्षण कर.
तुझ्या भक्ती उपासने मध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) पूर्व दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) उत्तर दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) दक्षिण दिशेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर.
तुझ्या भक्ती उपासने मध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) पूर्व दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) उत्तर दिशेकडून रक्षण कर. (तू माझे) दक्षिण दिशेकडून रक्षण कर. वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर. सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर.
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥ ४॥
तू वाङ्मय आहेस, तू चिन्मय (ज्ञान पूर्ण) आहेस. तू आनन्दमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू आनन्दस्वरूप अद्वितीय परमात्मा आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू ज्ञानमय आहेस, विज्ञानमय आहेस.
सर्वं जगदिदं त्वत्तोजायते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलोनभः । त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ ५ ॥
हे संपूर्ण जगत् तुझ्यापासून उत्पन्न होते. हे संपूर्ण जगत् तुझ्यामुळेच सुरक्षित राहते. हे संपूर्ण जगत् तुझ्यातच लय पावते. सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते. तूच भूमि, जल, अग्नि आणि आकाश आहेस.
वाणीच्या चार पदांमध्ये (परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी) तूच आहेस.
त्वं गुणत्रयातीतः । त्वं अवस्थात्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः ।
त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनोध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं
विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं
चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् ॥ ६॥
तू तिन्ही गुणांच्या (सत्त्व-रज-तम) पलीकडे आहेस. तू तिन्ही अवस्थांच्या (जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति) पलीकडे आहेस. तू तिन्ही देहांच्या (स्थूल, सूक्ष्म आणि कारण) पलीकडे आहेस. तू तिन्ही काळांच्या (भूत-भविष्य-वर्तमान) पलीकडे आहेस.
तू नित्य मूलाधार चक्रामधे स्थित असतोस. तुझ्यात तिन्ही शक्ति (प्रभु-शक्ति, उत्साह-शक्ति आणि मन्त्र-शक्ति) समाविष्ट आहेत. योगिजन नित्य तुझे ध्यान करतात.
तू ब्रह्म आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू इंद्र आहेस, तू अग्नी आहेस, तू वायू आहेस, तू सूर्य आहेस, तू चंद्र आहेस. तू (सगूण) ब्रह्म आहेस आणि तुझ्यात (निर्गुण) त्रिपाद भूः भुवः स्वः यांचा समावेश आहे.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिंस्तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः ।
अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ।
गकारः पूर्वरूपम् । अकारोमध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।
बिन्दुरुत्तररूपम् आदः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या ।
गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । श्रीमहागणपतिर्देवता ।
ॐ गं गणपतये नमः ॥ ७ ॥
ॐ गं गणपतये नमः ॥ ७ ॥
या प्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात.
गण या शब्दाचा पहिला वर्ग ग् (कार) हा प्रथम उच्चारावा; त्यानंतर त्यातील पहिला वर्ण (वर्ण म्हणजे अक्षर) अ (कार) हा उच्चारावा.
त्याच्यापुढे अनुस्वार उच्चारावा.
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदन्तिः प्रचोदयात् ॥ ८ ॥
एकदंताला आम्ही जाणतो. वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो. तो आम्हाला प्रकाशित करो (प्रेरित करो).
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतं च सृष्ट्यादौप्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवं ध्यायति योनित्यं स योगी योगिनां वरः ॥ ९॥
[गणेशाचे दृश्य स्वरूप अशा प्रकारचे आहे] त्याला एक दात (उजवा) आहे. चार हात आहेत. त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहेत.
(वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरदमुद्रा)
त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल (रक्त) रंगाचा आहे, त्याचे पोट मोठे (लंबोदर) आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत.
तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे.
हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे.
आणि जो त्याचे नित्य (नेहमी) ध्यान करतो तो सर्व योगींमधे श्रेष्ठ योगी होतो.
नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॥ १०॥
मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो. सर्व प्रमथांच्या (शंकराचे सेवक) स्वामीला माझा नमस्कार असो.
लंबोदराला नमस्कार असो. एकदंताला नमस्कार असो.
विघ्नांचा नाश करणाऱ्या शिव पुत्राला आणि वरद मूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.
फलश्रुति
एतदथर्वशीर्षं योऽधीते। स ब्रह्मभूयाय कल्पते। स सर्वविघ्नैर्न बाध्यते। स सर्वतः सुखमेधते। स पञ्चमहापापात् प्रमुच्यते। सायमधीयानोदिवसकृतं पापं नाशयति ।
प्रातरधीयानोरात्रिकृतं पापं नाशयति । सायं प्रातः प्रयुञ्जानः पापोऽपापो भवति । धर्मार्थकाममोक्षं च विन्दति ।
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् । योयदि मोहाद् दास्यति । स पापीयान् भवति । सहस्रावर्तनाद्यं यं काममधीते। तं तमनेन साधयेत् ॥ ११ ॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. त्याला सर्वत्र सुखप्राप्ती होते. त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा होत नाही.
तो पंचमहापातकापासून (ब्रह्महत्या, सुरापान, गुरुस्त्रीगमन, सुवर्ण' चौर्य आणि सुवर्ण चौर्य करणाऱ्याशी संसर्ग) मुक्त होतो.
संध्याकाळी पठण केले असता दिवस भरात केलेल्या पापांचा नाश होतो. प्रातः काळी पठाण केले असता रात्री केलेल्या पातकांचा नाश होतो.
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पठण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होते.
हे अथर्वशीर्ष अयोग्य शिष्याला शिकवू नये. जर कोणी कुठल्या मोहात पडून अयोग्य शिष्याला हा मंत्र देईल तर तो पापी ठरेल. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने केली असता, ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या त्या पूर्ण होतात.
हे अथर्वशीर्ष अयोग्य शिष्याला शिकवू नये. जर कोणी कुठल्या मोहात पडून अयोग्य शिष्याला हा मंत्र देईल तर तो पापी ठरेल. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने केली असता, ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या त्या पूर्ण होतात.
अनेन गणपतिमभिषिञ्चति । स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् जपति । स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् । ब्रह्माद्याचरणं विद्यान्न बिभेति कदाचनेति ॥ १२ ॥
जो या उपनिषदानी गणपतीची पूजा करतो तो उत्तम (प्रखर) वक्ता होतो. जो चतुर्थीला उपास करून या उपनिषदाचे पठण करतो त्याला विद्या (ज्ञान) प्राप्त होते.
असा अथर्वण ऋषींचा शब्द आहे. त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते. तो सर्व भयपासून मुक्त होतो.
यो दूर्वाङ्कुरैर्यजति । स वैश्रवणोपमो भवति । योलाजैर्यजति । स यशोवान् भवति । स मेधावान् भवति । यो मोदकसहस्रेण यजति स
वाञ्छितफलमवाप्नोति । यः साज्य समिद्भिर्यजति । स सर्वं लभते
स सर्वं लभते॥ १३॥
जो दुर्वांकुरांनी गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो. जो भाताच्या लाह्यांनी पूजन (हवन) करतो तो यशस्वी आणि बुद्धीवान होतो.
जो सहस्र मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवांच्छित फळ प्राप्त होते.
तूप आणि समिधांनी जो हवन करतो, तो सर्व काही प्राप्त करतो.
अष्टौब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा । सूर्यवर्चस्वी भवति ।
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौवा जप्त्वा । सिद्धमन्त्रोभवति ।
महाविघ्नात् प्रमुच्यते। महादोषात् प्रमुच्यते। महापापात्
प्रमुच्यते। महाप्रत्यवायात् प्रमुच्यते। स सर्वविद्भवति स
सर्वविद्भवति । य एवं वेद । इत्युपनिषत् ॥ १४॥
आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकविले असता शिकविणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो.
सूर्यग्रहणात महानद्यांच्या तीरावरील गणेश मूर्तींच्या सान्निध्यात ह्या मंत्राचा जप केला तर तो जप करणारा सिद्धमंत्र होतो.
हा जप करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो. महादोषांपासून मुक्त होतो. महापापांपासून मुक्त होतो. पापांच्या खोल गर्तेतून बाहेर पडतो.
तो सर्वज्ञानी होतो. तो सर्वज्ञानी होतो. हेच वेदांचे कथन आहे. इथे उपनिषद समाप्त झाले.
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे. डोळ्यांनी शुभ बघावे.
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ।
स्थिर अंगांनी आणि सुदृढ शरीरांनी, जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी.
स्वस्ति न इन्द्रोवृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ (सर्व जाणणारा) पूषा (सूर्य) देव आमचे कल्याण करो.
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नोबृहस्पतिर्दधातु॥
(सर्वांचे) रक्षणकर्ता गरुड (अस्तार्क्ष्यो) आमचे कल्याण करो. सर्वांना अनुकुल असणारा बृहस्पति आमचे मंगल करो/रक्षण करो.
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ॐ शान्ति शान्ति शान्ति