Vachmi



|| श्रीरामरक्षा स्तोत्रम् ||
(Shri Ramaraksha Stotram)

Shree Ramaraksha Stotram (श्रीरामरक्षास्तोत्रम्) is a Sanskrit stotra, hymn of praise and protection.
The composer of the Ramaraksha Stotram is Sage Budha Kaushika (Valmiki). Lord Shiva came into Budha Kaushika's dream and sang these 38 stanzas to him. It is believed that recitation of this great prayer would get rid of all the problems.
श्रीगणेशायनमः ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिक ऋषिः ।
श्रीसीतारामचंद्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः ।
सीता शक्तिः ।
श्रीमद्‌हनुमान् कीलकम् ।
श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
English Translation
मराठी भाषांतर
Salutations to the Lord Ganesha.
Of this Shree Ramaraksha stotra mantra(hymn),
The author is Budhakaushika,
The deity is Shree Seeta-Ramachandra,
The meter is Anushtup (eight syllables in a quarter),
The power is Seeta,
The protector is Hanuman.
The recitation is for Shree Ramachandra
श्री गणपतीला माझा नमस्कार असो.
या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा
ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून
सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत,
छंद अनुष्टुभ् आहे,
सीता शक्ती आहे,
हनुमान आधारस्तंभ आहे
श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे.


॥ अथ ध्यानम् ॥
Thus begins the meditation (of this mantra).
आता ध्यानाची सुरुवात करू या


ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्‌मासनस्थं ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥
वामाङ्‌कारूढ-सीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् ॥
May he be meditated upon, who has arms reaching his knees, who is holding a bow and arrow, who is seated in a 'padmasana' pose,
Who is wearing yellow clothes, whose eyes compete with petals of fresh lotus and who looks contented.
Whose sight is fixed on the (lotus) face of Seeta, who is sitting on his left thigh, whose glow is like that of cloud,
Who is shining with lustre of various ornaments and who is adorned with long hair, Ramchandra.
आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या,
पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करू या.
त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे.
शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभीत झालेला आहे.
॥ इति ध्यानम्॥
Thus ends the meditation.
आता ध्यानाची सांगता करू या.


चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
The life story of Sri Rama is as vast as hundred crore hymns.
Recitation of each and every word is capable of destroying even the greatest sins of people ॥1॥
श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे.
त्याचे एकेक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे. ॥१॥


ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥
Let us meditate on the blue-lotus like dark complexioned, lotus-eyed Rama
Who is accompanied by Sita and Lakshmana, and is well-adorned with crown of matted hair ॥2॥
नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे.
सीता आणि लक्ष्मण ज्याच्या समीप असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे ॥२॥


सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्‌-त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥
Who has sword, quiver of arrows, bow, arrow, who destroys (nocturnal/night-roamer) demons,
who is beyond birth (and hence beyond death) and who is incarnated by his own will to protect this world and who is ubiquitous ॥3॥
(The second line is addressed to Vishnu)
धनुष्यबाण आणि भात्याबरोबरच तलवारही हाती असणारा, निशाचरांचा म्हणजे राक्षसांचा नाश करणारा
जन्मरहित आणि म्हणूनच मृत्युरहित असून सुद्धा ज्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःला प्रकट केले आहे तो (विष्णु) सर्व विश्वाला तारणारा आणि व्यापून उरणारा आहे. ॥३॥


From second line below 'Protection' starts.
खाली दुसऱ्या ओळी पासून कवच सुरु होते.
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
(कवच सुरू)
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
May the wise, read the Hymn (of Lord) Rama (for) protection, which destroys all sins and grants all wishes/desires.
May Rama, Raghu's descendant, protect my head. May Rama, Dasharatha's son, protect my forehead ॥4॥
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे.
रघूच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो.॥४॥


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
May Kausalya's (son) protect my eyes, may favorite (disciple) of Vishvamitra protect my ears.
May the savior of sacrificial fire protect my nose, may affectionate to Lakshman protect my mouth ॥5॥
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्राला प्रिय (असलेला राम) माझ्या कानांचे रक्षण करो
यज्ञाचे रक्षण करणारा (राम) माझ्या नाकाचे रक्षण करो तर सुमित्रेचे ज्याच्यावर प्रेम आहे तो (राम) माझ्या मुखाचे रक्षण करो. ॥५॥


जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
May he who is full of wisdom protect my toungue, may he who is saluted by Bharat protect my neck
May the bearer of celestial weapons protect my shoulders, may he who broke Lord Shiva's bow protect my arms ॥6॥
विद्येचा खजिना असलेला माझ्या जिभेचे रक्षण करो, भरताला वंदनीय असलेला माझ्या कंठाचे रक्षण करो.
दिव्य शस्त्रास्त्रे असलेला माझ्या खांद्यांचे रक्षण करो तर शिवधनुष्याचा भंग करणारा माझ्या भुजांचे रक्षण करो.॥६॥


करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
May the husband of Seeta protect my hands, may he who won over Jamadagni's son (Parashurama) protect my heart
May the slayer of Khara (demon) protect my abdomen, may he who gave refuge to Jambavad protect my navel ॥7॥
सीतेचा पती माझ्या हातांचे रक्षण करो, जमदग्नी ऋषींच्या मुलाला (परशुरामाला) जिंकणारा माझ्या हृदयाचे रक्षण करो.
खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा माझ्या मध्यभागाचे रक्षण करो, (आणि) जांबुवंताला आश्रय देणारा माझ्या नाभिचे रक्षण करो.॥७॥


सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
May the Lord of Sugreev protect my waist, may master of Hanuman protect my hips
May the best of Raghu scions and destroyer of the lineage of demons protect my knees ॥8॥
सुग्रीवाचा देव माझ्या कंबरेचे रक्षण करो, हनुमंताचा प्रभु माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो.
रघुकुळातला उत्तम (पुरुष) व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारा माझ्या मांड्यांचे रक्षण करो.॥८॥


जानुनी सेतुकृत्पातु जङ्‌घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
May he who built of the bridge (Ram setu) protect my knees, may slayer of ten-faced (Ravana) protect my shins.
May he who bestowed wealth to Bibhishana protect my (both) feet, may Sri Rama protect my entire body ॥9॥
सेतु बांधणारा माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो, दशमुख रावणाचा अंत करणारा दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करो.
बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारा माझ्या पावलांचे रक्षण करो. श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. ॥९॥


Here 'Protection' is complete and Phalashruti (फलश्रुती) starts.
इथे कवच संपते आणि फलश्रुती सुरु होते.


एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
The do-gooder who would read this protective chant (hymn) based on the strength/power of Rama
would live long, be blessed with children, be victorious and will have humility ॥10॥
जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त अशा रक्षेचे (कवचाचे) पठण करेल
तो दीर्घायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल ॥१०॥


पातालभूतलव्योम चारिणश्छद्‌मचारिणः।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥
The evil traitors who travel in the hell, earth and heaven, and who travel secretly (by changing forms),
would not be even able to see the one who is protected by the chants (names) of Rama.
पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे मायावी आणि कपटी खोटे सोंग घेणारे (राक्षस)
रामनामांनी रक्षिलेल्या लोकांकडे (नजर वर उचलून) बघू सुद्धा शकत नाहीत. ॥११॥


रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैर्‌-भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥
The person who remembers (Ram by names such as) Ram, Ramabhadra or Ramachandra,
sins never get attached to him, he achieves good life and salvation ॥12॥
राम, रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो
तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ति मिळतात.॥१२॥


जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥
This world conquering mantra - blessed by Ram's name protects from all sides.
He who (wears this mantra in the throat which means) always chants/utters it, holds all the powers in his hand. ॥13॥
सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते.
जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो) त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. ॥१३॥


वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥१४॥
The name of this protective hymn (Kavacha) is Vajra Panjar (which means strong/hard cage).
He who remembers/recites this protective hymn is obeyed everywhere all the time and gets victory in all the things ॥14॥
ह्याचे (या कवच्याचे) नाव वज्रपंजर असे आहे. ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो
त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो. ॥१४॥


आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥
This protective hymn of Rama, as told by Lord Shiva in the dream
was written down by the awakened Budhakoushika in the morning ॥15॥
भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली
त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली. ॥१५॥


आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥१६॥
Who is like a garden of wish yielding trees and who stops all obstacles
Who is the praise of all three worlds, Sri Rama, he is Lord to us ॥16॥
कल्पवृक्षांच्या वनाप्रमाणे असणारा, सर्व दु:ख आणि संकटांचा शेवट करणारा
तिन्ही लोकांना आवडणारा तो श्रीमान् राम आमचा देव आहे.॥१६॥


Shloks 17th to 20th refer to both Shree Ram and Lakshaman.
१७ ते २०व्या श्लोकापर्यंतचे वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे.


तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ॥१७॥
Who are young, full of beauty, handsome, young and very strong lads
Who have broad eyes like lotus, who wear the hides/skins of Blackbucks as clothes ॥17॥
दोघे तरुण, रूपसंपन्न, सुकुमार, महाशक्तीशाली
कमळासारखे विशाल नेत्र असलेले, वल्कले आणि काळवीटाचे कातडे वस्त्राप्रमाणे धारण करणारे ॥१७॥


फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१८॥
Who are subsisting on roots and fruits and practicing penance and celibacy
Two brothers and sons of Dasharatha, Rama and Lakshmana ॥18॥
फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी
असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण ॥१८॥


शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ॥१९॥
Who give protection to all beings and who are foremost among all the archers
Who destroy whole race of demons, protect us, o best of scions of Raghu ॥19॥
सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ,
राक्षसांच्या कुळांचा वध करणारे, रघुकुळातले श्रेष्ठ वीर, म्हणजे राम व लक्ष्मण, आमचे रक्षण करोत. ॥१९॥


आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्॥२०॥
Holding bows pulled and ready, with arrows on them (on the bows), carrying 'ever full' quivers with them
May Ram and Lakshman be (go) always ahead of (escort) me in my path for my protection. ॥20॥
बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले(श्रीराम व लक्ष्मण)
माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझ्यापुढे चालोत.॥२०॥


संनद्धः कवची खड्‌गी चापबाणधरो युवा।
गच्छन्मनोरथोSस्माकं रामः पातु सलक्ष्मणः॥२१॥
Ram, wearing armour (shield), armed with sword, bow and arrows,
who makes our cherished thoughts come true in the world; may he, along with Lakshman, protect us. ॥21॥
चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरूण श्रीरामामुळे
आमचे मनोरथ सिद्धीस जावो आणि लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. ॥२१॥


रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः॥२२॥
Ram, the son of Dasharatha is brave and has a powerful person like Lakshman as his follower
Who belongs to the Kakutstha race, the perfect man (and) the son of Kausalya is the scion of Raghu family. ॥22॥
दशरथपुत्र श्रीराम शूर आहे, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्य त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो.
ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे.


वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥
(Shreeram) who can be perceived/understood by Vedanta (Upanishad), lord of sacrificial fire is ancient and best among all men
He is Seeta's beloved and his whose bravery is immeasurable ॥23॥
वेदांतामधून ज्याला जाणून घेता येऊ शकते, यज्ञाचा देव, सनातन पुरुष,
(श्रीराम) सीतेला अत्यंत प्रिय आहे. त्याच्या पराक्रमाची मोजदाद न करता येण्यासारखी आहे. ॥२३॥


इत्येतानि जपेन्नित्यं मद्‌भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः॥२४॥
Thus (lord Shiva says), my devotee who chants these names of Ram daily with faith
He, without any doubt, attains (is credited with) more (religious) virtuous deeds than the performance of Aswamedha Yadnya (Yagya) ॥24॥
भगवान शिव म्हणतात - अशाप्रकारे ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील
त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही.॥२४॥


रामं दूर्वादलश्यामं पद्‌माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः॥२५॥
Ram, dark-complexioned like leaves of doob grass (durva), who is lotus-eyed and dressed in yellow clothes,
Who praise him by (chanting) his divine names, are no longer ordinary men trapped in the world (they get liberated) ॥25॥
दूर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या (अशा)
श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या/ जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात.


रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथ-तनयं श्यामलं शान्तमूर्तिं ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्॥२६॥
Ram, the elder brother of Lakshman, the best of the scions of the Raghu race, the husband of Sita, who is handsome,
Who belongs to the Kakutstha race, who is the ocean of compassion, the stockpile of virtues, the beloved of the Brahmans and the protector of Dharma,
Who is the lord emperor of kings, who is the practiser of the Truth, the son of Dasarath, dark-complexioned and the personification of peace
(I) salute (him) who is beloved of all the people, the crown jewel of the Raghu dynasty and the enemy of Ravana ॥26॥
लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघुकुळातला श्रेष्ठ आणि सीतेचा पती असलेला श्रीराम सुंदर आहे.
तसेच ककुत्स्थ कुळातला, करूणेचा सागर आणि गुणांचा खजिना असलेला (श्रीराम) ब्राह्मणांना प्रिय व धार्मिक आहे.
राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेला, दशरथपुत्र, सावळा व जणू शांततेची मूर्ती आहे.
लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा शत्रू असलेल्या श्रीरामांना मी वंदन करतो. ॥२६॥


रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥
I salute to Ram, Ramabhadra (beloved Ram), Ramchandra (moon like peaceful Rama)
To Lord of Raghu Scion, Lord (of all), husband of Sita, I salute ॥27॥
मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला,
रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला वंदन करतो.॥२७॥


श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥
Ram who is the delight of the Raghus
Ram who is the elder brother of Bharat
Ram who is merciless in the war
I surrender to God Ram ॥28॥
श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत,
भरताचे थोरले बंधु आहेत,
रणांगणावर शूरवीर आहेत.
अशा श्रीरामांना मी शरण आहे.॥२८॥


श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥
I remember the feet of Shree Ramachandra in my mind
I praise the feet of Shree Ramachandra by my speech
I salute the feet of Shree Ramachandra by bowing down my head
I take refuge on the feet of Shree Ramachandra by bowing myself down ॥29॥
मी श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो,
मी श्रीरामांच्या चरणांचे वाणीने गुणवर्णन करतो,
मी श्रीरामांच्या चरणांना शिरसाष्टांग नमस्कार करतो
मी श्रीरामांच्या चरणांना शरण जातो.॥२९॥


माता रामो मत्पिता रामचन्द्रः।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः।
नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥
Mother is Ram, my father is Ramachandra
Lord is Ram, my friend is Ramachandra
My everything is benevolent Ramachandra
I know no one else other than him, I really don't!॥30॥
श्रीराम माझी माता आहेत, श्रीराम माझे पिता आहेत,
श्रीराम माझे स्वामी आहेत, श्रीराम माझा मित्र आहेत.
दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत.
मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही.॥३०॥


दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥
Who has Lakshman on his right and daughter of Janaka (Seeta) on the left
Who has Maruti (Hanuman) in his front, I salute to delight of the Raghus (Ram) ॥31॥
ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता आहे
ज्याच्या पुढे मारुती आहे अशा रघुनंदनाला मी वंदन करतो.॥३१॥


लोकाभिरामं रणरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥
People beloved, Courageous and brave in war, lotus-eyed, lord of the Raghu race
Personification of compassion and merciful, I surrender to (that) Lord Shree Ram ॥32॥
लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाने नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या,
कारुण्याची मूर्ति असलेल्या, दया करणाऱ्या श्रीरामांना मी शरण जातो.॥३२॥


मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥
Who is as fast as the mind, equals wind in speed, who has mastery over his senses (organs), foremost amongst knowledgeable
Son of the Wind, leader of the Monkey forces, messenger of Shree Ram, I bow down to him (to Hanuman) ॥33॥
मनाप्रमाणे, वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ,
पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या श्रीरामांच्या दूताला (हनुमानाला) मी शरण जातो.॥३३॥


कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥
(He who) sings (chants) the sweet name of Ram as 'Ram', 'Ram'
Perched atop poetry-tree, I salute that nightingale (cuckoo) in the form of (Sage) Valmiki.
राम राम अशा मधुर अक्षरांचे कूजन करत असलेल्या
कवितेच्या शाखेवर बसलेल्या वाल्मिकीरूपी कोकिळेला मी वंदन करतो.॥३४॥


आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥
Who is destroyer all dangers and giver of all sorts of wealth
I again and again salute Ram who is cynosure of all eyes (of all people) ॥35॥
संकटांचा नाश करणाऱ्या, सुखसमृद्धी देणाऱ्या,
लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुनः पुनः नमन करतो.॥३५॥


भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥
To annihilate the cause of rebirth (cause of liberation), to earn happiness and wealth
To scare Yama's (lord of death) messengers, one should roar (chant) the name of Ram ॥36॥
संसारवृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुखसमृद्धी मिळवण्यासाठी,
यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी (जप करावा).॥३६॥


(In the next Shlok, all Vibhaktis of word Ram have been used.)
(पुढच्या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत)


रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥
I worship Ram who is jewel among kings, who always wins and who is lord of Lakshmi (goddess of wealth)
Who has killed hordes of demons, who move at night, I salute that Ram
There is no place of surrender greater than Ram, (and thus) I am servant of Ram
My mind is totally absorbed in Rama. O Ram, please lift me up ॥37॥
राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला- विष्णुला भजतो.
रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले. त्या रामाला वंदन असो.
रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे.
रामामध्ये माझा चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे राम माझा उद्धार कर.॥३७॥


राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
(Shankar tells Parvati) Beautiful (pleasing) lady! In chanting his name ('Ram Ram') again and again , I discover joy and it pleases my heart.
Chanting the name of Ram is equal to the chanting of one thousand names (of Lord Vishnu) ॥38॥
(शंकर पार्वतीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो.
रामाचे एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.॥३८॥


इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्॥
Thus the Hymn of protection, Shree Ramaraksha Stotra, composed by Budha-Kaushika is complete.
श्रीबुधकौशिकऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले.


॥ श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु॥
Let this hymn be devoted to (Lord) Seeta-Ramachandra.
हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो.


॥ शुभं भवतु ॥