Vachmi


मुळ अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.

  1. श्रीगणेशा करणे – आरंभ करणे
  2. अंग धरणे – लठ्ठ होणे
  3. अंगाला होणे – अंगाला छान बसणे
  4. अमलात आणणे – कारवाई करणे
  5. अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे
  6. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप येणे, खूप राग येणे
  7. अन्नास जागणे – उपकाराची आठवण ठेवणे
  8. आकाश फाटणे – चारी बाजूंनी संकटे येणे
  9. आच लागणे – झळ लागणे
  10. उखळ पांढरे होणे – पुष्कळ फायदा होणे
  11. उदास होणे – खिन्न होणे
  12. उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती
  13. उर भरून येणे – गदगदून येणे
  14. उसंत मिळणे – वेळ मिळणे
  15. ओढा असणे – कल असणे
  16. कहर करणे – अतिरेक करणे
  17. कपाळमोक्ष होणे – मरण पावणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे
  18. कंठस्नान घालणे – ठार मारणे
  19. कच्छपी लागणे – नादी लागणे
  20. कानउघाडणी करणे- – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे
  21. कायापालट होणे – स्वरूप पूर्णपणे बदलणे
  22. खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे
  23. खसखस पिकणे – मोठ्याने हसणे
  24. खूणगाठ बांधणे – निश्चय करणे
  25. खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे
  26. खडे फोडणे – दोष देणे
  27. खो घालणे – विघ्न निर्माण करणे
  28. गाडी अडणे – खोळंबा होणे
  29. घर धुऊन नेणे – सर्वस्वी लुबाडणे
  30. घाम गाळणे – खूप कष्ट करणे
  31. घोडे मारणे – नुकसान करणे
  32. चतुर्भुज होणे – लग्न करणे
  33. चंग बांधणे – निश्चय करणे
  34. चेहरा खुलणे – आनंद होणे
  35. चेहरा पडणे – लाज वाटणे, खजील होणे
  36. जिभेला हाड नसणे – वाटेल ते बोलणे
  37. जिवाची मुंबई करणे – अतिशय चैनबाजी करणे
  38. जीव अधीर होणे – उतावीळ होणे
  39. जीव भांड्यात पडणे – काळजी दूर होणे
  40. जीव की प्राण असणे – अत्यंत प्रिय असणे
  41. टिकाव लागणे – निभाव लागणे
  42. डोळे निवणे – समाधान होणे
  43. डोळे फिरणे – खुप घाबरणे
  44. डोळेझाक करणे – दुर्लक्ष्य करणे
  45. ताळ्यावर आणणे – योग्य समज देणे
  46. तळपायाची आग मस्तकात जाणे – अतिशय संताप होणे
  47. थांग न लागणे – कल्पना न येणे
  48. दक्षता घेणे – काळजी घेणे
  49. देखरेख करणे – राखण करणे
  50. देखभाल करणे – जतन करणे
  51. दगा देणे – फसवणे
  52. दबा धरून बसणे – टपून बसणे
  53. दडी मारणे – लपून राहणे
  54. दात धरणे – वैर बाळगणे
  55. दाढी धरणे – विनवणी करणे
  56. दगडावरची रेघ – खोटे बोलणारे शब्द
  57. दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे
  58. दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे
  59. धारातीर्थ पडणे – रणांगणावर मृत्यू येणे
  60. धुडगूस घालणे – गोंधळ करणे
  61. धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे
  62. धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे
  63. नजरेत भरणे – उठून दिसणे
  64. नाळ तोडणे – संबंध तोडणे
  65. निवास करणे – राहणे
  66. निद्राधीन होणे – झोपणे
  67. पदरी घेणे – स्वीकार करणे
  68. पाळी येणे – वेळ येणे
  69. पाठीशी घालणे – संरक्षण देणे
  70. पाणी पडणे – वाया जाणे
  71. पाणी पाजणे – पराभव करणे
  72. पाऊल वाकडे पडणे – वाईट मार्गाने जाणे
  73. पाठिंबा देणे – दुजोरा देणे
  74. पोटात घालणे – क्षमा करणे
  75. प्रतिकार करणे – विरोध करणे
  76. प्रतिष्ठा लाभणे – मान मिळणे
  77. प्रत्यय येणे – प्रचिती येणे
  78. प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे
  79. प्राणावर उदार होणे – जिवाची पर्वा न करणे
  80. फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे
  81. फुटाण्यासारखे उडणे – झटकन राग येणे
  82. बारा वाजणे – पूर्ण नाश होणे
  83. बत्तिशी रंगवणे – जोराने थोबाडात मारणे
  84. बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे
  85. बेत करणे – योजना आखणे
  86. बेत हाणून पाडणे – बेत सिद्धीला जाऊ न देणे
  87. बोल लावणे – दोष देणे
  88. बोळयाने दूध पिणे – बुद्धीहीन असणे
  89. भगीरथ प्रयत्न करणे – चिकाटीने प्रयत्न करणे
  90. भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे
  91. भान नसणे – जाणीव नसणे
  92. भ्रमण करणे – भटकंती करणे
  93. मात करणे – विजय मिळवणे
  94. मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे
  95. माशा मारणे – कोणताही उद्योग न करणे
  96. मिशीवर ताव मारणे – बढाई मारणे
  97. मूग गिळणे – उत्तर न देता गप्प राहणे
  98. मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे
  99. मनात घर करणे – मनात कायमचे राहणे
  100. मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे
  101. मान्यता पावणे – सिद्ध होणे
  102. रक्ताचे पाणी करणे – अतिशय मेहनत करणे
  103. रवाना होणे – निघून जाणे
  104. राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे
  105. राब राब राबणे – सतत खूप मेहनत करणे
  106. राम नसणे – अर्थ नसणे
  107. राम म्हणणे – मृत्यू येणे
  108. रियाज करणे – सराव करणे
  109. वकीलपत्र घेणे – एखाद्याची बाजू घेणे
  110. वाट लावणे – विल्हेवाट लावणे
  111. वठणीवर आणणे – ताळ्यावर आणणे
  112. वाचा बसणे – एक शब्दही बोलता न येणे
  113. वेड घेऊन पेडगावला जाणे – मुद्दाम डोंग करणे
  114. विहरणे – संचार करणे
  115. व्रत घेणे – वसा घेणे
  116. वजन पडणे – प्रभाव पडणे
  117. शिगेला पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे
  118. शंभर वर्ष भरणे – नाश होण्याची वेळ येणे
  119. सांगड घालणे – मेळ साधणे
  120. समरस होणे – गुंग होणे
  121. सूड घेणे – बदला घेणे
  122. सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
  123. साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे
  124. सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे
  125. साक्षर होणे – लिहिता – वाचता येणे
  126. सुतोवाच करणे – पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे
  127. सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे
  128. स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे
  129. स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने , गर्वाने अतिशय फुगणे
  130. सहभागी होणे – सामील होणे
  131. हशा पिकणे – हस्यस्फोट होणे
  132. हवालदिल होणे – हताश होणे
  133. हट्टाला पेटणे – मुळीच हट्ट न सोडणे
  134. हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे
  135. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
  136. हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे
  137. हस्तगत करणे – ताब्यात घेणे
  138. हातपाय गळणे – धीर सुटणे
  139. हातचा मळ असणे – सहज शक्य असणे
  140. हात ओला होणे – फायदा होणे
  141. हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे
  142. हात देणे – मदत करणे
  143. हात मारणे – भरपूर खाणे
  144. हाय खाणे – धास्ती घेणे
  145. हातवार तुरी देणे – डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
  146. हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे
  147. हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे
  148. हातापाया पडणे – गयावया करणे
  149. हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे
  150. हूल देणे – चकवणे