Vachmi

Chanakya, also called Kautilya or Vishnugupta, (flourished 300 BCE) was a Hindu statesman and a philosopher who wrote a classic treatise on polity, Artha-shastra (“The Science of Material Gain”). Chanakya became a counsellor and adviser to Chandragupta (reigned c. 321–c. 297), founder of the Mauryan empire of northern India.

Chanakyaniti is a collection of aphorisms written by Chanakya.

Mandala
प्रणम्य शिरसा विष्णुं त्रैलोक्याधिपतिं प्रभुम् ।
नानाशास्त्रोद्धृतं वक्ष्ये राजनीतिसमुच्चयम् ॥
तिन्ही जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णुला नमन करून मी नीतिशास्त्राचे नियम सांगतो. मी हे सूत्र अनेक शास्त्रांचा आधार घेऊन सांगतो आहे.
Humbly bowing down in front of Almighty Vishnu, who is the Lord of the Three worlds, I recite the rules (maxims) of the science of political ethics (Niti) selected from various sastras.
Mandala
गुणो भूषयते रूपं, शीलं भूषयते कुलम् ।
सिद्धिभूषयते विद्यां, भोगो भूषयते धनम् ॥
चांगल्या गुणांनी रूपाची (रूपवान स्त्रीची किंवा पुरुषाची) शोभा वाढते. शीलाने कुळाची शोभा वाढते. (कुलीन लोकांची शोभा शीलाने वाढते)
सिध्दीने विद्येची शोभा वाढते आणि धनाची शोभा त्याचा उपभोग घेतल्याने वाढते.
Virtues enhance the beauty of a form. Good manners enhance the glory of a family.
Perfection enhances the value of education. And enjoyment enhances the pleasures of wealth.
Mandala
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः।
वसन्ते समये प्राप्ते, काकः काकः पिकः पिकः ॥
कावळा काळा असतो. कोकिळाही काळी असते. दोघांमध्ये काय फरक आहे?
जेव्हा वसंत ऋतु येतो तेव्हा समजते की कावळा, कावळा आहे आणि कोकिळा, कोकिळा आहे.
Crow is black. Cuckoo is also black. Then what is the difference between a crow and a Cuckoo?
When Spring (season) comes, one gets to know which one is a crow and which one is a cuckoo.
Mandala
कोकिलानां स्वरो रूपं स्त्रीणां रूपं पतिव्रतम्।
विद्यारूपं कुरुपाणां क्षमा रूपं तपस्विनाम् ॥
कोकिळ पक्षांचे रूप त्यांचे मंजुळ स्वर असतात. स्त्रियांचे रूप त्यांचे पातिव्रत्य असते.
कुरूप लोकांचे रूप त्यांचे ज्ञान असते आणि तपस्वी लोकांचे रूप क्षमा (क्षमाशील वृत्ती) असते.
Cuckoo bird’s beauty is in their sweet voice, women’s beauty is in their dedication to their husband.
Knowledge is the beauty of ugly people and Forgiveness is the beauty of the sages.
Mandala
धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पञ्चमः ।
पञ्च यत्र न विद्यन्ते तत्र वासं न कारयेत् ॥
धनवान लोक, वेद जाणणारे ज्ञानी, राजा, नदी आणि वैद्य, ह्या पाच गोष्टींचे जिथे वास्तव्य नाही, तिथे वास करू नये (तिथे राहू नये).
One should not live at a place where wealthy people, wise people (who know Vedas), a king, a river and a doctor are not present.
Mandala
जलबिन्दु निपातेन क्रमशः पूर्यते: घटः ।
स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ॥
पाण्याचा एक एक थेंब पडल्याने घडा भरतो.
त्याच उद्देशाने सर्व विद्यांचा, धर्माचा आणि संपत्तीचा हळू हळू संचय करावा.
With each drop of water the pitcher gradually gets filled.
In the same way, knowledge, merit and wealth should be accumulated.
Mandala
तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायाश्च मस्तके ।
वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वाङ्गे दुर्जनस्य च ॥
सापाच्या दातात विष असते, माशीच्या डोक्यात विष असते,
विंचवाच्या शेपटीत विष असते तर दुर्जनाच्या सर्वांगात विष असते.
A snake has poison in its teeth, a bee in its head,
a scorpion has poison in its tail, whereas durjan (an evil/bad person) has poison in all parts of his body.