Vachmi

A subhashita is a literary genre of Sanskrit poems and their message is an aphorism, maxim, advice, fact, truth, lesson or riddle. Su (सु) in Sanskrit means good; bhashita (भाषितानि) means spoken; which together literally means well spoken or eloquent saying.

सुष्ठु प्रोक्तानि वचनानि इति सुभाषितानि

Subhashitas in Sanskrit are short memorable verses, typically in four padas (verses) but sometimes just two, but their structure follows a meter. The authors of most Subhashita are unknown.

Here, we bring to you some selected Subhashitas. You may also refer चाणक्य नीति (Chanakya Niti) for many more subhashit.
Mandala
Divine Sanskrit Subhashit, Sweet and Melodious Subhashit


भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
तस्यां हि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम् ॥
सर्व भाषांमध्ये प्रमुख, मधुर आणि दिव्य देवभाषा संस्कृत आहे.
त्यात (संस्कृत मध्ये) सुद्धा काव्य आणि काव्यामध्ये सर्वात गोड सुभाषित आहेत.
Of all the languages, Sanskrit is the prime language which is sweet and divine.
In Sanskrit, poetry is melodious and within poetry, subhashit is the most melodious and sweet.
Mandala
Speak the Truth


सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात ब्रूयान्नब्रूयात् सत्यंप्रियम्।
प्रियं च नानृतम् ब्रुयादेषः धर्मः सनातनः॥
सत्य बोला. दुसऱ्यांना प्रिय वाटणारे (आवडणारे) बोला. परंतु अप्रिय सत्य बोलू नका.
प्रिय आणि असत्य बोलु नका. हा सनातन धर्म आहे.
Speak the truth. Speak what pleases others. But one should not say things that are true but not pleasant.
And nor should one say nice things if they are not true. This is the ancient practice (sanatana dharma).
Mandala
Altruism


मूलं भुजङ्गैः शिखरं विहङ्गैः शाखां प्लवगैः कुसुमानि भृङ्गैः।
आश्चर्यमेतत् खलुचन्दनस्य परोपकाराय सतां विभूतयः॥
चंदन वृक्षाची मुळे सापांना, शिखर पक्ष्यांना, फांद्या माकडांना आणि फुले मधमाशांना आसरा देतात.
चंदन वृक्षाप्रमाणे, सज्जनांचा जन्म खरोखर परोपकारासाठीच असतो.
Roots of the sandalwood tree provide shelter to snakes, its top provides place to birds, its branches provide shelter to monkeys and it flowers provide shelter to bees.
Really, the reason for the existance of saintly people, like the sandalwood tree, is for altruism (for helping others) alone.
Mandala
Gain Knowledge and Accumulate Wealth - every moment, each penny


क्षणशः कणशश्चैव विद्यां अर्थं च साधयेत्।
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम्॥
क्षणा क्षणानी विद्या आणि कणा कणाने धन प्राप्त करावे.
क्षण नष्ट केल्यावर (वाया घालवल्यानंतर) कुठली विद्या आणि कण नष्ट केल्यावर कुठले धन.
One should earn knowledge every single moment and one should earn wealth by accumulating every single penny (smallest unit of money)
There is no knowledge if valuable time is wasted and there is no money after wasting small sums of money.


न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् ।
यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम् ॥
जसे प्राण्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणे स्वतः काठी (शस्त्र) उचलून देव मनुष्याचे रक्षण करत नाहीत.
त्यांना ज्याचे रक्षण करायचे असते त्याला ते बुद्धी देतात.
Gods do not themselves pick up a staff (rod) to protect us like it is done for protecting the animals (like the shepherd guarding his flock).
They give intelligence to that person whose safety they wish to assure.
Mandala
Do not Repent the Past, Do not Worry about Future, Live in the Present


गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:॥
गेलेल्या (काळा बद्दल) शोक करू नये. भविष्याचीही काळजी करू नये.
बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणे वागतात/ वर्तमान काळात जगतात.
One should not repent the past. One should not worry about the future.
Wise people live in the present.
Mandala
Value Your Time - 'Do it Now'


श्वः-कार्यमद्य कुर्वीत, पूर्वाह्णे चापराह्णिकम् ।
न हि प्रतीक्षते मृत्युः, कृतं वास्य न वा कृतम् ॥
उद्याचे काम आजच करावे आणि दुपारनंतर करावयाचे कार्य दुपारपूर्वच करावे.
(कारण) मृत्यू , तुम्ही काम केले की नाही याची वाट बघत नाही.
Tomorrow's work should be done today (itself), and afternoon's (work) in forenoon.
Death does not wait (to check) if (the work) has been done or not done.
Mandala
न कश्चिदपि जानाति कि कस्य श्वो भविष्यति।
अतः श्वो करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्॥
उद्या काय होणार ते कोणालाही माहित नाही.
म्हणून बुद्धिवान माणसाने उद्याचे काम आजच करावे.
No one knows what is going to happen tomorrow.
Therefore a wise person should do today what he is going to do tomorrow.
Mandala
आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न न लभ्यते।
नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो
आयुष्याचा एक क्षण सर्व रत्न देउन् सुद्धा प्राप्त करत येत नाही.
म्हणून याला (वेळेला) वाया घालवण्यासारखी मोठी चुक नाही.
Even a single second in life cannot be brought back by giving all precious jewels.
Hence spending it wastefully is a great mistake.
Mandala
Forgiveness


क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किं न सिद्ध्यति॥
क्षमा हे निर्बल लोकांचे बळ आहे. क्षमा हे बलवान लोकांचे भूषण आहे.
क्षमा संपूर्ण विश्वाला आपल्या ताब्यात ठेवते. क्षमेने काय साध्य करता येत नाही. (सर्व साध्य करता येतं)
Forgiveness is the power of powerless. Forgiveness adorns the powerful.
Forgiveness controls this entire world. What cannot be achieved by forgiveness!
Mandala
Knowledge, Wealth, Virtue


प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितं धनम्।
तृतीये नार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यसि॥
जीवनाच्या पहिल्या भागात विद्या, दुसऱ्या भागात धन, तिसऱ्या भागात पुण्य मिळवलं नाही तर चौथ्या भागात काय करशील?

If you do not gain knowledge in the first phase of life, do not earn (amass wealth) in the second phase of life,
do not earn virtue in the third phase of life, then what will you do in the fourth phase of life?
Mandala
Unwise People


नमन्ति फलिनो वृक्षा नमन्ति गुणिनो जनाः।
शुष्ककाष्ठश्च मूर्खश्च न नमन्ति कदाचन॥
फळे लागलेल्या झाडाच्या फांदया वाकतात. गुणी लोक त्यांच्या विनम्रतेमुळे दुसऱ्यांसमोर वाकतात (दुसऱ्यांना मान देतात).
पण वाळलेल्या फांदया आणि मूर्ख लोक कधीही वाकत नाहीत.
The branches of a tree laden with fruits bend downwards. Virtuous people bend out of respect for others.
However, dry logs and unwise people never bend.


Mandala
Temperance and Patience


उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमये तथा।
सम्पतौ च विपत्तौ च महतामेकरुपता॥
सूर्य उगवताना आणि मावळताना (दोन्ही वेळेस) एकसारखाच लाल रंगाचा दिसतो.
त्याचप्रमाणे महान (श्रेष्ठ) लोक सुखात किंवा संकटात एकसारखेच (संयमी) वागतात.
The sun looks same (red colour) while rising and setting.
In the same way, great men stay alike in good and bad times.
Mandala
Never leave Fire, Loan and Enemy Unattended


अग्निः शेषं ऋण: शेषं शत्रुः शेषं तथैव च।
पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत्॥
अग्नि, कर्ज आणि शत्रू जर थोडेही शिल्लक राहिले
तर पुन्हा पुन्हा वाढतात (डोके वर काढतात). म्हणून त्यांना थोडेही शिल्लक ठेऊ नये. (त्यांना पूर्णपणे समाप्त करावे.)
If you let remain even a small amount of fire, loan and enemy unattended,
they will increase again and again. Hence they should not be left open even in a small quantity.
Mandala
A man/woman without virtues is as good as an animal


येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ।
ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति ॥
ज्यांच्याकडे विद्या नाही, तप नाही, जे लोक दान करत नाहीत, जे ज्ञानी नाहीत, (ज्यांच्याकडे) शील नाही, गुण नाही, जे धर्माचे पालन करत नाहीत
ते लोक या मृत्युलोकी पृथ्वीवर भारच असतात. (असे लोक) मनुष्यरुपात जनावरांप्रमाणे वावरतात.
Those who have neither knowledge nor penance, who do not donate, who have neither knowledge, nor good conduct, who are not virtuous, who do not follow their duties
Such people are only a burden on earth and pass their life in this world of mortals like beasts in human form.
Mandala
No Pain (Efforts), No Gain


उद्यमेनैव हि सिद्ध्यन्ति, कार्याणि न मनोरथै।
न हि सुप्तस्य सिंहस्य​, प्रविशन्ति मृगाः॥
प्रयत्न केल्यानीच कार्ये (कामे) पूर्ण होतात. केवळ इच्छा केल्यानी नाहीत.
झोपलेल्या सिंहाच्या तोंडात मृग आपणहून प्रवेश करत नाहीत.
Any work is accomplished only by putting in efforts; not by merely wishing for them to get completed.
A prey by itself does not enter into a sleeping lion's mouth.
Mandala
Good Health and Regular Exercise go hand in hand


व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ॥
व्यायाम करुन स्वास्थ्य, दीर्घ आयुष्य, बळ आणि सुख प्राप्त होते.
निरोगी असणे हे परम (सर्वात मोठे) भाग्य आहे. उत्तम आरोग्य असेल तर सर्व कार्य सिद्धिस जातात.
One can achieve health, long life, strength and happiness by exercising (regularly).
Good health is the best blessing (one can get). All can be accomplished if one is healthy.
Mandala


श्रमक्लमपिपासोष्णशीतादीनां सहिष्णुता ।
आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ॥
श्रम, थकवा, तहान, उष्णता, थंडी इत्यादि सहन करण्याची शक्ती
आणि उत्तम आरोग्य सुद्धा व्यायामातून (व्यायाम केल्याने) उत्पन्न होते (प्राप्त होते).
Tolerance towards (putting in) effort, tiredness, thirst, heat, cold etc.
and good health also is produced (born) from exercise.
Mandala
Anger


क्रोधमूलो मनस्तापः क्रोधः संसारबन्धनम्।
धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥
क्रोध (राग) मनस्तापाचे कारण आहे. क्रोध माणसाला संसारपाशात बांधून ठेवते.
क्रोध धर्माचा विनाश करतो. म्हणून क्रोधाचा त्याग करावा.
Anger is the root of mental distress, it ties one to worldly life.
Anger ruins righteousness, therefore, give up anger.
Mandala
The World is One Family


अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैवकुटम्बकम्॥
हे माझे आहे, हे दुसऱ्याचे आहे असा विचार संकुचित मनाची लोकच करतात
परंतु उदार (विशाल) मनाची माणसं संपूर्ण वसुधेलाच (पृथ्वीलाच) आपले कुटुंब मानतात.
Only narrow minded people count (think) like 'this belongs to me' and 'that belongs to others'.
But broad minded people consider the entire earth as their family.
Mandala
Industriousness, Bravery, Courage, Intellect, Strength and Valor


उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः ।
षट् एते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत्॥
उद्योजकता, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती (आणि) पराक्रम
हे सहा (गुण) जेथे (ज्या माणसामध्ये) आहेत, तेथे (त्याला) देव स्वतः मदत करतो.
Industriousness, bravery, courage, intellect, strength, valor
Where these six (virtues) reside, God (Himself) is helpful (comes to help) there.
Mandala
अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥
घोड्याचे आभूषण त्याचा वेग असतो. मदमस्त चाल हे हत्तीचे भूषण असते.
चातुर्य हे स्त्रीचे भूषण असते (आणि) उद्यमशीलता हे पुरुषाचे आभूषण असते.
Adornment of a horse is his speed and that of an elephant is his majestic gait.
Women's ornament are their wit and skillfulness. Men are adorned for their industriousness.
Mandala
Prudence, Discretion


हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।
नीर-क्षीर-विवेके तु हंसो हंसः बको बकः ॥
हंस पांढऱ्या रंगाचा असतो, बगळा ही पांढऱ्या रंगाचा असतो; मग हंस आणि बगळ्यामधे काय फरक?
नीर-क्षीर-विवेकानेच (दूध आणि पाणी वेगळे करण्यातच), हंस हंस ठरतो (असतो) आणि बगळा बगळा.
A swan is white, a crane is white. What (then) is the difference between a swan and a crane? In distinguishing between (or, in separating) water and milk, (one comes to know) a swan is a swan, a crane is a crane.
Mandala
Peace, Contentment, Control of your Greed and Compassion


शान्तितुल्यं तपो नास्ति, न सन्तोषात् परं सुखम् ।
न तृष्णायाः परो व्याधिः, न च धर्मो दयापरः ॥
मनःशांती सारखं दुसरं तप नाही, समाधानाहून मोठे दुसरं सुख नाही
लोभापेक्षा वाईट दुसरा रोग नाही, आणि दयेपेक्षा मोठा दुसरा धर्म नाही
There is no endeavor nobler than peace, no pleasure bigger than contentment.
no disease worse than greed, and there is no duty (dharma) higher than compassion.
Mandala
Friends and Friendship


मित्रेण कलहं कृत्वा न कदापि सुखी जनः ।
इति ज्ञात्वा प्रयासेन तदेव परिवर्जयेत् ॥
आपल्या मित्राबरोबर भांडण करून (कोणी) व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही.
हे जाणून, प्रयत्नपूर्वक ते (भांडण) टाळावे.
A person can never be happy after fighting with a friend.
Knowing this, one should diligently avoid it (getting into a fight).
Mandala
वनानि दहतो वन्हे: सखा भवति मारुत​: ।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥
वन्हि (अग्नि) जेव्हा वनाला जाळतो तेव्हा वारा त्याचा मित्र बनतो (त्याला मदत करतो).
तोच वारा लहानश्या दिव्याला विझवुन टाकतो. दुबळ्या लोकांबरोबर कोणी मित्रता करत नाही.
When fire burns down a forest, wind becomes it's (fire's) friend. (The wind helps fire to spread)
The same wind extinguishes (destroys) a small lamp. Nobody wants to have friendship with powerless people. (If one does not have power/wealth, he does not have friends.)
Mandala
Reading is a Good Habit


वाचनं ज्ञानदं बाल्ये, तारुण्ये शीलरक्षकम् ।
वार्धक्ये दुःखहरणम्, हितं सद्ग्रन्थवाचनम् ॥
लहानपणी वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. तरुणपणी ते (वाचन केल्याने) चारित्र्याचे रक्षण करते.
उतार वयात (म्हातारपणी) ते दुःख दूर करते. चांगलं पुस्तक वाचणे हे (खरोखर) हितकारक असते.
Reading provides knowledge in childhood. It protects our character in adulthood.
It removes sorrow in old age. Indeed, reading a good book is always beneficial.
Mandala
Greed


लोभात् क्रोधः प्रभवति लोभात् कामः प्रजायते ।
लोभात् मोहः च नाशः च लोभः पापस्य कारणम् ॥
लोभातून क्रोध उत्पन्न होतो; लोभातून वासना उत्पन्न होते;
लोभातूनच होतो मोह आणि नाश. लोभामुळेच मनुष्य पाप करतो.
From greed originates anger; greed gives rise to lust/desire;
from greed (comes) attachment and ruin. Greed is the cuase of sin.
Mandala
Appearances are deceptive


वेषं न विश्वसेत् प्राज्ञ: वेषो दोषाय जायते ।
रावणो भिक्षुरूपेण जहार जनकात्मजाम् ॥
केवळ वेशभूषेवर कधीही विश्वास ठेवू नये. (बाह्य) वेषभूशा फसव्या असतात.
रावणाने भिक्षूचे रुप घेऊनच सीतेचे हरण केले होते.
A wise man does not trust (external) appearances (an appearance of a paerson). Appearances are deceptive. (Seldom judge a person as a saint by one's appearance).
It was under the guise of a Sadhu (saint) that Ravana abducted Sita.
Mandala
Fickle Minded people


क्षणे रुष्टाः क्षणे तुष्टाः रुष्टाः तुष्टाः क्षणे क्षणे ।
अव्यवस्थितचित्तानां प्रसादः अपि भयंकरः ॥
क्षणांत क्रोधी क्षणांत समाधानी, ज्यांच्या मनाचा कल प्रत्येक क्षणाला बदलतो,
अशा सतत गोंधळलेल्या मनस्थिती असलेल्या लोकांची आपल्यावर कृपादृष्टी असली तरी ते भयंकरच असते.
Angry one moment and content another, angry and content every moment (changing moods often);
Even favours from people who do not have a steady mind is quite frightening.
Mandala
Wicked people


हस्ती हस्त सहस्त्रेण शत हस्तेन वाजिनः ।
श्रृङ्गिणी दश हस्तेन देशत्यागेन दुर्जनः ॥
हत्तीपासून हजार हाताने, घोड्यापासून शंभर हाताने
शिंग असलेल्या जनावरापासून दहा हाताने (आणि) दुर्जनांपासून देश त्यागाने (देश त्याग करुन) दूर रहावे.
One should stay thousand hands (a unit of measurement) away from an elephant, stay hundred hands away from a horse,
stay ten hands away from animals having horns (but) to stay away from wicked people, (there is no other way but to) leave the place itself.
Mandala
Dharma - Difference between Human beings and animals


आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषाम् अधिकोविशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥
खाणे, झोपणे, भय आणि लैंगिक वृत्ती या गोष्टी मनुष्य आणि प्राणी या दोघांमधेही समान आहेत.
धर्म हाच त्यांचे (मनुष्यांचे) विशेष आहे. धर्माशिवाय (मनुष्य) पशुसमान आहे.
Eating, sleeping, fear and sexual instinct are common to both human beings and animals.
It is dharma which separates the two because, without dharma a human being is same as animal.